HMPV व्हायरसचा धोका वाढतोय; गुजरातमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला संसर्ग, देशातील तिसरा रुग्ण

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात मुलांना HMPV या व्हायरसची लागण होत आहे. आता हिंदुस्थानतही या व्हायरसचा धोका वाढत आहे. या व्हायरसचा पहिले दोन रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला होते. आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका दोन महिन्यांच्या मुलाचा या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या मुलावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत या व्हायरसचे तीन रुग्ण आढळ्याने धोका वाढत आहे.

आतापर्यंत गुजरात आणि कर्नाटक राज्यात रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात एक तीन महिन्यांची मुलगी आणि दुसरा 8 महिन्यांच्या मुलाचा याचा संसर्ग झाला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मुलांन किंवा त्यांच्या पलकांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. तरी या मुलांना या व्हायरसची लागण कशी झाली असा सवाल उपस्थित होत आहे. गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने HMPV व्हायरसबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सातत्याने वाढत असलेल्या प्रकरणांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. गुजरात आणि कर्नाटकसह देशभरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी 0.7 टक्के HMPV चे असतात. तसेच, या व्हायरसचा स्ट्रेन अद्याप समजलेला नाही. आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतिही भीती बाळगू नका, योग्य ती काळजी घ्या, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.