पुण्यात पुन्हा ‘हिट अॅण्ड रन’ स्वारगेटच्या ग्रेड सेपरेटरमध्ये अपघात; सीए तरुणाचा मृत्यू

बोपोडी आणि पिंपळे सौदागर येथे रविवारी रात्री घडलेल्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाच्या जखमा ताजा असतानाच आज सकाळी पुन्हा पुण्यात असाच प्रकार घडला. स्वारगेट येथील ग्रेड सेपरेटरमध्ये दुचाकीस्वार सनदी लेखपाल (सीए) तरुणाला उडवून मोटारचालक पसार झाला.सागर सुरेश मंत्री (वय 34, रा. हडपसर) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये दोघांचा नाहक बळी
उपराजधानीत हिट अँड रनच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला. पहिला अपघात कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. भावेश रविंद्र भरणे (27) हा बारा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने जात असताना एका टिप्परने त्याला जोरदार घडक दिली आणि चालक फरार झाला. भावेशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. भावेशला दोन वर्षांचा मुलगा आहे. दुसऱया अपघातात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकाश महंत (29) हा दुचाकी उभी करून पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनचालकाने त्याला धडक दिली आणि तो फरार झाला. त्यालाही रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.