कर्णधार श्रेयस अय्यरचा भोपळा, संजू सॅमसनच्या अपयशामुळे 4 बाद 52 अशा बिकट अवस्थेत असलेल्या हिंदुस्थान ‘ड’ संघाला देवदत्त पडिक्कलच्या 92 धावांत गुंडाळला आणि हिंदुस्थान ‘अ’ ने दुसऱ्या डावात 115 धावांची सलामी देत आपली आघाडी 222 धावांपर्यंत नेत दुलीप ट्रॉफीच्या सामन्यावर आपली पकड घट्ट केली.
हिंदुस्थानी संघाचे द्वार उघडणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यातही श्रेयस अय्यरला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्या सामन्यातही त्याने 9 आणि 54 धावांच्या खेळ्या केल्या होत्या. आज त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण तो खलील अहमदच्या गोलंदाजीवर एकही धाव न करता बाद झाला. देवदत्त पडिक्कलने रिकी भुई आणि हर्षित राणाबरोबर उपयुक्त भागीदाऱ्या रचत संघाला दीडशेपार नेले. देवदत्तने 124 चेंडूंत 92 धावा केल्या. तो बाद झाल्यावर हर्षित राणाने संघाची मजल 183 वर नेली.