
तामीळनाडूचा भाषिक संघर्ष आणखी चिघळत चालला आहे. हिंदू विरुद्ध तमीळ असा वाद सुरू झाला आहे. आता तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी लादल्यास विरोध करणारच तसेच तमीळ वंश आणि भाषेचे रक्षण करणार, असा संकल्प आपल्या 72 व्या वाढदिवशी केला. केंद्र सरकार प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली त्रिभाषा धोरण राबवत आहे. हे धोरण म्हणजे बिगर हिंदू भाषिक राज्यांमध्ये हिंदी लादण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.
शाळांमध्ये पंजाबी आणि तेलगू भाषा सक्ती केल्याबद्दल स्टॅलिन यांनी पंजाब आणि तेलंगणाचे कौतुक केले. दोन्ही राज्यांनी पेंद्रातील भाजप सरकारचा खोटारडेपणा उघड केल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. तामीळनाडूप्रमाणे प्रत्येक राज्याने आपली मातृभाषा वाचवण्यासाठी हे केले पाहिजे असेही ते म्हणाले. तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मला अधिक दृढनिश्चयाने काम करण्याची आणि तमीळ वंश तसेच भाषेच्या रक्षणासाठी संघर्ष पुढे नेण्याची प्रेरणा दिली आहे. असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.