कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानची पोस्ट पुन्हा चर्चेत, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहते झाले भावूक

‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ फेम हिना खान गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यावर झुंज देत आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत आणि ती सातत्याने आपल्या चाहत्यांसोबत तिचा प्रवास शेअर करत असते. कर्करोगाशी लढणाऱ्या हिनाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच भावूक केले आहे. त्यात तिने आपल्या जगण्याच्या संघर्षाबाबत लिहीले आहे.

हिना खानने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये कर्करोगाशी सामना करताना तिला होणाऱ्या वेदनेनंतरही हार पत्करलेली नाही.ती धैर्याने तोंड देत आहे. तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने चाहत्यांना सांगितले आहे की, तिच्यासाठी 2024 अनेक संकटांनी भरलेले होते. हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, इथे जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे की, या नवीन वर्षात जेव्हा घड्याळात बारा वाजतील तेव्हा मी येणारे वर्षच नव्हे तर स्वत:लाही नव्याने उभारी घेईन. कारण या वर्षाने मला जेवढा विचार केला त्यापेक्षाही जास्त दिले आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत.

हिनाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते भावूक झाले. यावर पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट करत आहेत. कमेंटमध्ये, हिना लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. काही लोकांचे डोळे पाणावले आहेत आणि त्यांनी रडणारे इमोजी शेअर केले. हिना खान लवकरच या आजारातून बरी होणार आहे. ती निरोगी होत आहे. नुकतीच ती विंटर वेकेशनसाठी अबुधाबीला गेली होती, मात्र आता ती हिंदुस्थानात परतली आहे. हिनाने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले – आता घरी परतत आहे. तिची ही पोस्टही व्हायरल झाली.