टिव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आगामी ‘गृह लक्ष्मी’ वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान ती सध्या वाळवंटी प्रदेशात गेली आहे. जिथून तिने आपले सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
ऑफ व्हाईट गाऊन, शॉर्ट हेअर, विग आणि डोळ्यावर स्टायलिश चष्मा यामध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.
एका फोटोत हिना वाळवंट आणि झाडांमध्ये फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
वाळवंटात हिनाने वेगवेगळ्य़ा पोझ देत आपले फोटो शेअर केले आहेत.
हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. यासोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘शुक्रन.’ हिनाने काही हार्ट इमोजी देखील जोडले आहेत.
हिनाच्या या लूकवर आणि फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. चाहते अभिनेत्रीला सुंदर म्हणत आहेत आणि ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
हिना खान ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहे. गेल्या वर्षीच तिने आपल्या आजाराची माहिती दिली होती. तेव्हापासून अभिनेत्री सतत तिच्या तब्येतीचे अपडेट्स देत असते.
कॅन्सरच्या उपचारादरम्यान हिना खान ‘गृहलक्ष्मी’ या शोमधून बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर परतत आहे. त्याच्या शोचा टीझर आला आहे. हा शो 16 जानेवारीला ‘एपिक ऑन’ वर प्रसारित होईल.