डोंगराळ भागात होणाऱ्या हिमवर्षावामुळे सखल परिसरात थंडी प्रचंड वाढली आहे. पश्चिमी वाऱ्यांमुळे उत्तर हिंदुस्थानातील डोंगराळ राज्ये, जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडच्या डोंगराळ परिसरात हिमवर्षाव सुरु झाला आहे. अशातच हिमाचल प्रदेशच्या विभिन्न जिल्ह्यांमध्ये हिमवर्षावानंतर तीन राष्ट्रीय राजमार्गांसमेत जवळपास 134 रस्ते बंद करण्यात आले आहेत. शिवाय हिमवर्षावामुळे तापमानाच्या तेजीत घट आली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडींने लोकं हुडहुडली आहेत.
राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिमल्यात सगळ्यात जास्त रस्ते बंद आहेत. शिमल्यामध्ये 77 रस्ते बंद आहे. तर पाउस आणि हिमवर्षामुळे 65 ट्रान्सफॉर्मर बाधित झाले आहेत. त्यामुळे अनेक परिसरात ब्लॅकआऊट झाले आहे.
शिमला आणि मनालीमध्ये क्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी हजारो पर्यटक पोहोचले आहेत. ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाहौलच्या सिस्सू आणि कोकसरहून टनल रोहतांगपर्यंत बर्फामध्ये 8500 आणि कुफरीमध्ये 1500 पर्यटक अडकले आहेत.