इस्रायलने एअरस्ट्राईक करून हिजबुल्लाहच्या कमांडरला ठार केले आहे. इस्रायलकडून लेबनानवर हल्ले सुरूच आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने बेरुतमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यात हिजबुल्लाहचा कमांडर इब्राहिम कुबैसी ठार झाला आहे.
बेरुतच्या दक्षिण उपनगरात इस्रायलने एअरस्ट्राईक केला. त्यात हिजबुल्लाहचा कमांडर कुबैसीसोबत सहाजण ठार झाले. आम्ही कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू शकत नाही असे इस्रायसलच्या सैन्यप्रमुखाने म्हटले होते.
इस्रायलने लेबनानवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यांमुळे अस्थिरता वाढत जाईल असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.