मध्य पुर्वेत इस्रायल आणि हिज्बुल्लाह संघटनेत तणाव वाढला आहे. आज लेबननमधून इस्रायलवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. हा हल्ला हिज्बुल्लाह संघटनेने केल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या उत्तर भागातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
इस्रायलने उत्तर भागात आणि हायफा शहरात मोठ्या समारंभांवर बंदी घातली आहे. आज इस्रायलवर जो हल्ला झाला त्यात कुणीही जखमी झालेले नाही. इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हिज्बुल्लाह संघटनेने इस्रायलच्या उत्तर भागातील सैन्याच्या विमानतळावर हल्ला केला. त्यानंतर गोलन हाईट्स आणि गलील भागात सायरन वाजले केले. या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि अनेक गाड्यांना आग लागली.