चंद्रपूर झाले सूर्यपूर, देशात सर्वात हॉट

गेले दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून सुटका होईल असे वाटत असतानाच आज विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. आज देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये झाली असून येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील अनेक शहरांचा पारा 44 अंशाच्या पार गेला आहे.