कर्नाटकात अलीकडच्या काही वर्षांत बीयरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. विशेष करून कोरोना काळानंतर लोक व्होडका, बीयर, ब्रँडी, रम सोडून बीयरला पसंती देऊ लागले आहेत. बंगळुरू शहरात तर वर्षा-दरवर्षाला बीयर विक्रीत मोठी वाढ दिसते. गेल्या वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत 13.3 टक्के वाढ झाली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही वाढ 49 टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. कर्नाटक सरकारच्या महसूल विभागाने ही आकडेवारी दिली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार कोरोना काळात बीयर आणि दारूचा खप कमी झाला होता. 2020-21 काळात परिस्थिती थोडी बदलली. त्या वर्षी 6.05 कोटी लिटर बीयरची विक्री झाली. 2021-22 नंतर कोरोनाचा कहर कमी झाला. पब आणि बार सुरू झाल्यानंतर बीयरचा खप तेजीने वाढला. 2022-23 या वर्षी तर बंगळुरूत 10.17 कोटी लीटर बीयर विकली गेली. बंगळुरूमध्ये वातावरण उष्ण असते. उकाडय़ामुळे महागडे मद्य पिणारेही बीयरकडे वळतात. यामुळे बीयरची विक्री वाढते.