भाजप उमेदवाराला हायकोर्टाचा दणका

पुणे पदवीधर मतदार संघातून 2020 साली भरघोस मतांनी विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देणार्या भाजप उमेदवाराला हायकोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. शेवटच्या टप्प्यात झालेल्या मतदानावर याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेला संशय निरर्थक असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी याचिका फेटाळून लावली.

पुणे पदवीधर मतदार संघाच्या 2020 साली झालेल्या निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेस कडून अरुण लाड तर भाजप कडून संग्राम देशमुख यांना तिकीट देण्यात आले. मात्र निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी 1 लाख 22 हजार 145 मते मिळवत भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला.