
लातूर महापालिका, अंबरनाथ नगर परिषदेने 90 टक्क्यांहून अधिक बेकायदा हार्ंडग्ज हटवले असून शहरे विद्रूप करणारी होर्डिंग मुंबईसह इतर शहरांत कायम असल्याने हायकोर्टाने आज नाराजी व्यक्त केली. लातूर, अंबरनाथ पालिकांना जे जमले ते तुम्हाला का नाही, असा सवाल करत लातूर, अंबरनाथ पालिकेचे कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवा अशा शब्दांत हायकोर्टाने आज सरकारसह इतर पालिका प्रशासनांना सुनावले.