आनंद तेलतुंबडेंच्या अपिलावर सुनावणीस न्यायमूर्तींचा नकार

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण तसेच एल्गार परिषद प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. मात्र या अपिलावर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने आज नकार दिला. त्यामुळे तेलतुंबडे यांच्या अपिलावर दुसऱया खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार प्रकरण घडले. तेलतुंबडे यांनी सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. मात्र विशेष कोर्टाने तो फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला तेलतुंबडे यांनी आव्हान दिले आहे.