
नातेवाईकाचा चावा घेतला म्हणून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या महिलेला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलासा दिला आहे. माणसाच्या दातामुळे गंभीर दुखापत होऊ शकत नाही त्यामुळे ते धोकादायक नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने महिले विरोधातील एफआयआर रद्द केला.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार तक्रारदार महिलेचा तिच्या मेहुणीने चावा घेतला होता. त्यामुळे धोकादायक शस्त्रांनी नुकसान पोहोचवणे, एखाद्याला दुखापत करणे या कलमांतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
न्यायालय काय म्हणाले
z या प्रकरणात तक्रारदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून असे निदर्शनास येते की, दातांच्या खुणांमुळे साधी दुखापत झाली आहे.
z भारतीय दंड संहितेच्या कलम 324 (धोकादायक शस्त्राच्या मदतीने एखाद्याला इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा सिद्ध होत नसताना आरोपीला खटल्याला सामोरे जावे लागणे हे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल.