सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन बटण तसेच लोकेशन ट्रेकर उपकरणाचा अभाव असल्याने नव्या तसेच जुन्या वाहनांमध्ये उपकरण बसवण्यात यावेत, अशी मागणी करत एका संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने आज या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.