मध्य रेल्वेला हायकोर्टाचा झटका

लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला भरपाई नाकारणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाने झटका दिला. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी मृत तरुणाच्या आईचा दावा मान्य करीत आठ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. रेल्वेने भरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी उल्हासनगर-अंबरनाथदरम्यान तरुण लोकलमधून खाली पडला होता. त्यात गंभीर दुखापत होऊन तरुणाचा मृत्यू झाला होता, याकडे लक्ष वेधत तरुणाची आई गीता ठाकूर यांनी अॅड. दीपक आजगेकर यांच्यामार्फत अपील दाखल केले होते.