ठाणे जात पडताळणी समितीने जात पडताळणीचा अर्ज न स्वीकारल्याने उच्च न्यायालयाने येथील विभागीय सहआयुक्तांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दिनकर पावरा असे या सहआयुक्तांचे नाव आहे. सावरा यांनी सॅलेरी अकाऊंटमधून दंडाची रक्कम 10 जानेवारी 2015पर्यंत न्यायालयात जमा करावी. नंतर हे पैसे कीर्ती विधी महाविद्यालयाला देण्यात यावेत, असे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने दिले.
काय आहे प्रकरण
आयुष बस्तावने अॅड. रामचंद्र मेहंदाळकर यांच्यामार्फत ही याचिका केली होती. जात पडताळणीसाठी ठाणे जात पडताळणी समितीसमोर अर्ज केला. मात्र हा अर्ज नोकरी करत असलेल्या ठिकाणाकडून किंवा शिक्षण संस्थेने केला नसल्याचे सांगत समितीने अर्ज स्वीकारला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.