नरेश गोयल यांना दिलासा; हायकोर्टाने अंतरिम जामीन केला कायम

तब्बल 538 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेले जेट एअरवेज पंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना कर्करोगाच्या उपचारासाठी देण्यात आलेला अंतरिम जामीन उच्च न्यायालयाने सोमवारी कायम केला. उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी गोयल यांनी याचिका केली होती. त्याची दखल घेत न्या. एन.जे. जमादार यांच्या एकल पीठाने गोयल यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. आता जामिनाची मुदत महिन्याने वाढवली आहे.