न्यायालयाबद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका

न्यायालयाबद्दल अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या नवी मुंबईच्या सोसायटीतील एका महिलेला हायकोर्टाने आज दणका दिला. न्यायालयाला डॉग माफिया म्हटल्या प्रकरणी हायकोर्टाने महिलेला दोन हजार रुपयांचा दंड व एक आठवडय़ाची साध्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सीवुड्स इस्टेट सोसायटीत राहणाऱ्याद्द लीला वर्मा यांची मोलकरीण भटक्या श्वानांना सोसायटीच्या आवारात खाद्य घालत असल्याने तिला सोसायटीत प्रवेश नाकारला. सोसायटीच्या या निर्णयामुळे आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा वर्मा यांनी करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.