होणाऱ्या पत्नीपासून बहिणीचा आंतरजातीय विवाह लपवणे म्हणजे ही एक प्रकारची क्रूरता आहे, असे स्पष्ट निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे. 2018 साली एका महिलेचा विवाह झाला. लग्न जमवताना नवऱ्याकडील मंडळींनी वराला केवळ दोन बहिणी असल्याचे सांगितले होते. तिसऱ्या बहिणीची माहिती मुद्दामहून लपवली होती. लग्नाच्या दोन दिवसांनंतर तिसरी बहीण असून तिने आंतरजातीय विवाह केला आहे, असे महिलेले समजले. त्यामुळे नवऱ्याकडील मंडळींनी आपली फसवणूक केली आहे, असे म्हणत ती माहेरी गेली. तसेच काही दिवसांनंतर तिने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. माझ्या नवऱ्याने आमच्या कुटुंबाची फसवणूक केली. त्याला तीन बहिणी असताना आम्हाला मात्र दोन बहिणी असल्याचे सांगितले. तिसऱ्या बहिणीची माहिती मुद्दामहून लपवून फसवणूक केली, असे महिलेचे म्हणणे आहे.