
आजकालच्या धावपळीमध्ये आपल्याला चेहऱ्याकडे फार लक्ष द्यायला मिळत नाही. परंतु थोडा वेळ काढून आपण चेहऱ्यासाठी खूप उत्तम उपाय करु शकतो. मुख्य म्हणजे हे उपाय फार खर्चिकही नाहीत. असाच एक घरच्या घरी उपाय करा जास्वंदीच्या फुलाचा. जास्वंदी फुलाचा वापर करुन तुम्ही सुंदर दिसू शकता. जास्वंदीचे फूल चेहऱ्यासाठी वरदान मानले जाते. कुठल्याही महाग सौंदर्यप्रसाधनावर मात करेल असे जास्वंदीच्या फुलाचे उपयोग आहेत. त्वचेला चमक आणण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जाऊ शकतो. जास्वंदीची फुले त्वचेसाठी खूप उत्तम मानली जातात. जास्वंदीमुळे चेहऱ्यावरील मुरुम, डाग दूर करता येतात.
जास्वंदीच्या फुलाचे चेहऱ्यासाठी उपयोग
जास्वंदाच्या फुलांनी तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी, रात्रभर एक कप पाण्यात जास्वंदाची फुले भिजवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी वेगळे करा आणि या पाण्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. आता कापसाचा वापर करून या पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ करा. असे केल्याने, चेहरा आतून स्वच्छ होईल, त्वचाही सुंदर दिसेल.
जास्वंदाच्या फुलांपासून स्क्रब बनवण्यासाठी, २ ते ३ जास्वंदाची फुले धुवून पेस्ट बनवा. आता त्यात कोरफडीचे जेल आणि साखर किंवा ओट्स पावडर घालून मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाने चेहऱ्यावर गोलाकार हालचालीत मालिश करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर ५ मिनिटे राहू द्या. हे मिश्रण ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास आणि त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करेल. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा.
जास्वंदाच्या फुलांनी चेहऱ्यावर मालिश करण्यासाठी, जास्वंदाच्या फुलांना वाळवून पावडर बनवा. आता त्यात बदाम तेल घालून मिश्रण तयार करा. आता हे चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. अशा प्रकारे जास्वंदीच्या फुलाने मसाज केल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमे आणि पुरळ देखील कमी होतात.
जास्वंदीच्या फुलाचा फेस पॅक बनवण्यासाठी, 2 चमचे जास्वंदीच्या फुलाची पावडर घ्या. त्यात 1 चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर 15 ते 20 मिनिटे लावा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. हे पॅक त्वचेला पोषण देते आणि त्वचा चमकदार बनवते.