हिजबुल्लाहचा इस्त्रायलवर हल्ला, 300 हून अधिक रॉकेट डागले; आणीबाणी लागू

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धाचा भडका थांबण्याचे नाव घेत नाही. एकीकडे इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठाण्यांना लक्ष्य केले आहे, तर दुसरीकडे हिजबुल्लाहनेही इस्रायलवर मोठा रॉकेट हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने इस्त्रायलवर 300 हून अधिक रॉकेट डागले आहेत. हिजबुल्लाहने केलेला हा हल्ला इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याचे प्रतिउत्तर आहे. ज्यामध्ये इस्त्रायलच्या सेैन्याने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त  केल्याचा दावा केला होता.

हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनला लागून असलेल्या इस्त्रायली क्षेत्रावर सातत्याने सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. इस्त्रायल सैन्याने या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्त्रायलमध्ये आणीबाणी लागू केली आहे. दरम्यान, रविवारी पहाटे इस्त्रायलने लेबनॉनच्या सीमेत घुसून हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहकडून सांगण्यात आले की, हा हल्ला इस्त्रायली सैन्यांना ठिकाणांना लक्ष्य करुन करण्यात आला होता. हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने ट्विटरवर लिहिले, आम्ही दहशतवादाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करतो, ते नागरिकांना लक्ष्य करतात.

हिजबुल्लाहने रविवारी सकाळी जाहीर केले की, त्यांनी बेरूतमध्ये आपल्या एका कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इस्रायलवर ड्रोन हल्ला केला. हिजबुल्लाहच्या निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला इस्त्रायलच्या सैन्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करुन केला आहे ज्याची घोषणा नंतर केली जाईल” आणि सोबत शत्रूची अनेक ठिकाणे आणि बॅरेक्स आणि ‘आयर्न डोम’ प्लॅटफॉर्मवरना लक्ष्य केले आहे. त्यांच्या निवेदनात सांगण्यात आले की, हे हल्ले गेल्या महिन्यात बेरूतच्या दक्षिणी उपनगरात झालेल्या हल्ल्यात फवाद शुक्र यांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.