हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. इंडिया आघाडीच्या 10 पक्षांच्या नेत्यांच्या साक्षीने राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आज रांची येथील मोरहाबादी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे.