हेमंत मानकामे यांचे निधन

दहिसर विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि निवेदक हेमंत मानकामे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि तीन भाऊ असा परिवार आहे. मानकामे यांच्यावर दहिसर येथील कांदरपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर तसेच दहिसर विभागातील शिवसैनिक आणि रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.