Dengue Prevention – पावसाळ्यानंतर डेंग्यूचा मोठा धोका, अशा प्रकारे करा मुलांचे रक्षण

डेंग्यू ताप सामान्यत:  प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांसाठी अधिक गंभीर असतो. लहान मुले याला सहज बळी पडतात. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेतली पाहिजे. काही उपाय करुन मुलांना डेंग्यूपासून वाचवता येते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी असते, त्यामुळे त्यांना डेंग्यूचा धोका जास्त असतो. डेंग्यू धोकादायक व प्राणघातक देखील असू शकतो. अशा परिस्थितीत मुलांचा डेंग्यूपासून बचाव कसा करावा यासाठी काही उपाय आहेत.

मुलांमधील डेंग्यूची लक्षणे
तीव्र ताप
उलट्या
शरीर वेदना
मानसिक धक्का
शरीरावर पुरळ

आपल्या मुलांना डेंग्यूपासून असे वाचवा

1. योग्य कपडे घाला
मुलांना पावसाळ्यात डेंग्यूपासून वाचवण्यासाठी त्यांना हलके, सैल आणि पूर्ण बाह्यचे कपडे घालावेत. संध्याकाळी किंवा रात्री घराबाहेर पडू नका. रात्री मच्छरदानीत झोपा.

2. घराभोवती स्वच्छता ठेवा
डेंग्यूपासून मुलांना वाचवण्यासाठी घराभोवती स्वच्छता ठेवा. कुठेही पाणी साचू नये. कारण या पाण्याने डासांची पैदास होते. संध्याकाळी खिडकी दरवाजे बंद करावे.

3. मुलांच्या स्वच्छतेची काळजी घ्या
डेंग्यूचा प्रसार एडीस डासांच्या चावण्याने होतो. अशा प्रकारचे डास आणि बॅक्टेरीया टाळण्यासाठी मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. मुलांना जेवण्याआधी, शाळेतून आल्यावर किंवा दूषित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची सवय लावा.

4. मुलांना पौष्टिक आहार द्या
मुलांना आहारात आवश्यक पोषक तत्व द्यावीत. जिवनसत्व, खनिजे, समृद्ध आहार खायला द्या. त्यांना संत्री, किवी, लिंबू, स्ट्रॅाबेरी, पत्ताकोबी, फूलकोबी आणि टोमॅटो असे पदार्थ द्या.

डेंग्यूमधून बरे झाल्यानंतर अशक्तपणा दूर करण्यासाठी काय करावे ?
पौष्टिक आहाराने डेंग्यूचा आजार लवकर बरा होऊ शकतो. डेंग्यूमळे शरीराला होणाऱ्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी प्रथिने, लोह, यांसारखे पोषक पदार्थ खावेत. ताजी फळे, भाज्या आणि दूध, दही यांचे सेवन करावे. यामुळे शरीराला पोषण मिळते आणि डेंग्यू नंतरच्या समस्या टाळता येतात.