
थाटामाटात लग्न पार पडल्यानंतर नव्या नवरीला आणण्यासाठी नवरदेवाने थेट हॅलिकॉप्टर सासरवाडीला नेले. पहिल्यांदा गावात हॅलिकॉप्टर आले. हॅलिकॉप्टरला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. ही घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील आहे. मध्य प्रदेशात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज राय यांचा विवाह नुकताच पार पडला. पत्नी सुप्रीया राणीला आणण्यासाठी धीरज राय यांनी थेट हॅलिकॉप्टर बुक केले. पहिल्यांदा सासरवाडीला जायचे म्हणून त्यांनी हे केले. गावचा जवाई थेट हॅलिकॉप्टरने आल्याचे पाहून सासरकडील मंडळी आणि गावकरी प्रचंड आनंदी झाले. यासाठी प्रशासनाने सकाळपासून आवश्यक ती तयारी केली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत नवदाम्पत्यांची बँड बाजा बारात सोबत भव्य स्वागत करण्यात आले. हॅलिकॉप्टर जवळपास एक तास या ठिकाणी थांबले होते. नवरी आणि नवरदेवासोबत संपूर्ण कुटुंबाने हॅलिकॉप्टरमधून प्रवास केला. अनेकांनी हॅलिकॉप्टरसोबत फोटो काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.