नदीत हेलिकॉप्टर कोसळून सीमेन्सच्या अध्यक्षांचा मृत्यू

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट आणि पाच स्पॅनिश पर्यटकांचा समावेश आहे. सीमेन्स या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान पंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.