केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टरची बुकिंग सुरू

केदारनाथ धामचे दर्शन हेलिकॉप्टरने घ्यायचे असल्यास याची ऑनलाइन बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. बुकिंगची सविस्तर माहिती heliyatra.irctc.co.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. येत्या 2 मे रोजी केदारनाथ धामचे कपाट उघडण्यात येणार आहेत. हेलिकॉप्टर सेवेसाठी उत्तराखंड नागरिक उड्डाण विकास प्राधिकरण आणि आयआरसीटीसी यांनी तयारी सुरू केली आहे. भाविकांना बुकिंग करता यावी यासाठी वेबसाईटची लिंक दिली आहे. ही बुकिंग 31 मेपर्यंत असणार आहे. गुप्तकाशी ते केदारनाथचे भाडे 8 हजार 533 रुपये असून हेलिकॉप्टर प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंग अत्यावश्यक आहे.