Rain Alert : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळणार; 200 ते 500 मिमी पावसाचा IMD चा इशारा

मुंबई आणि उपनगरात पावसाने काल रात्रीपासून पुन्हा जोर धरला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांवरही परिणाम दिसून आला. यानंतर हवामान विभागाने ट्विट करत येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवसांत 200 एमएम ते 500 एमएम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

ब्रिटनच्या हवामान विभागाचे ट्विट होसाळीकर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दक्षिण आशियाचा नकाशा पोस्ट केला आहे. आशियातील काही दक्षिणेकडील आणि आग्नेय भागांमध्ये पुढील आठवडाभरात किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत जोरदार मोसमी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. काही ठिकाणी 200 ते 500 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारतातील काही हिल्स स्टेशनवर 700 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.