Satara News : साताऱ्याला पाणीपुरवठा करणारे कास धरण ओव्हरफ्लो

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण रात्री ओवर फ्लो झाल्याने सातारकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. 0.5 टीएमसी पाणीसाठा असणारे 22 मीटर उंचीचे कास धरण आता पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहत आहे. कास धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱया पाण्याच्या ठिकाणी भुशी डॅमचा फिल येऊ लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

सातारा जिह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे या भागातील धरणांमध्ये पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. धरणांची पाणीपातळी वाढू लागली आहे. धरण ओव्हर फ्लो होऊन सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कास धरणाची दोन वर्षांपूर्वी उंची वाढवण्यात आल्याने पूर्वीच्या तुलनेत धरणात चौपट पाणीसाठा झाला आहे.

धरण ओव्हरफ्लो झाल्याने दुष्काळात पाणी कपातीचे चटके सहन करणाऱया सातारकरांना आता मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर कास धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱया 15 गावांचा पाणीप्रश्नही संपुष्टात आला आहे.