काल मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढे पाच दिवसांतही मुसळधार पाऊस पडेस असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. पुढच्या पाच दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. उद्या पुणे आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 26 तारखेला पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
24 Sep, Heavy rainfall alerts for Maharashtra during next 4,5 days by IMD.
Pl keep watch on alerts by IMD pic.twitter.com/ATAJ1RZsqk— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2024