मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, मुलुंड आणि भांडूपमध्ये साचले पाणी; अंधेरी सबवे तात्पुरता बंद

 

आज मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुलुंड आणि भांडूपमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली आहे.

अंधेरीमध्ये सलग अर्धा तास पाऊस पडत होता. त्यामुळे अंधेरी सबवे तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

दुसरीकडे हवामान विभागाने रायगड, पुणे आणि पालघरला रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.