सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, हजारो पर्यटक अडकले

सिक्कीममध्ये मूसळधार पाऊस आणि भूस्खलन झाले आहे. त्यामुळे तिथे हजारो पर्यटक अडकले आहेत. सिक्कीमच्या लाचेन-चूंगथांग मार्ग आणि लाचून-चूंगथांग मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्त्यांवर ढिगारे साचले आहेत. जोरदार पावसामुळे हा ढिगाराही हटवता येत नाहीये. सिक्कीममध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यास अडथळा येत आहे. सिक्कीममध्ये येणाऱ्य़ा पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे.