राजस्थानात ईदच्या नमाजानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद; महामार्गावरील वाहतूक ठप्प

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात सोमवारी ईदच्या नमाजानंतर पोलीस आणि मुस्लिम समुदायाच्या स्थानिकांमध्ये वाद झाला. समुदायातीस स्थानिकांनी स्टँड चौकात मिरवणूक काढण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली. मिरवणुकीवेळी घोषणाबाजी करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट शब्दात बजावले. पोलिसांच्या या भूमिकेवर स्थानिकांनी आक्षेप घेतला आणि वादाला तोंड फुटले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसेच गर्दी जमल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

ईदच्या नमाजानंतर मुस्लिम समुदायातील स्थानिकांनी पोलिसांकडे मिरवणूक काढण्याची परवानगी मागितली. मिरवणुकीवेळी घोषणाबाजी करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट शब्दात बजावले. पोलिसांच्या या भूमिकेवर स्थानिकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्याचे रुपांतर वादात झाले. जमावाकडून घोषणाबाजीही करण्यात आली, त्यामुळे गर्दी वाढतच गेली. वाढत्या गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांनी जमावाला पांगवले आणि सुव्यवस्था पूर्ववत केली.