उन्हात फिरताय…? सोबत टोपी, पाणी राहू द्या! तापमानाचा पारा वाढल्यानंतर ‘हे’ करू नका

पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानात सतत वाढ होत असून, उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येण्याची आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेऊन संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबीयांचे संरक्षण करावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात तापमान वाढत असून, पारा 35 च्या पुढे गेला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. उष्णतेपासून बचावासाठी तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत, चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, थंड पाण्याने स्नान करावे, लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध व आजारी व्यक्तींची अधिकची काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता सावलीचा आधार घ्यावा, आवश्यक तेवढाच व्यायाम करावा, अतिश्रम टाळावे.

Buttermilk Benefits- ताकाला पृथ्वीवरील ‘अमृत’ का म्हणतात हे ठाऊक आहे का? सविस्तर वाचा आरोग्यासाठी ताक का आहे उपयुक्त

हे करू नये

– लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये
– दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
– गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
– बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
– उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे
– मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

Benefits Of Deep Breathing- उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे दीर्घ श्वसन, वाचा दीर्घ श्वसनाचे फायदे