31 मार्च हा भंडारा जिल्ह्यासाठी सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. तब्बल 46 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. संपूर्ण विदर्भातही भंडारा जिल्ह्याचा तापमान सर्वाधिक होते. यावर्षीही सर्वाधिक तापमानाचा दिवस म्हणून 31 मे ची नोंद झाली आहे. हवामान खात्याने कालपासून भंडारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून तीन तारखेपर्यंत हा येलो अलर्ट राहणार आहे. यादरम्यान तासी 30 ते 40 किमी ने उष्ण लहरी प्रवाहित होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे विनंती हवामान खात्याने केली आहे.
नागरिकांनी उष्मघातापासून सावध राहण्यासाठी दुपारी 12 ते 4 दरम्यान आवश्यक नसल्यास बाहेर पडू नये. काही कामानिमित्त बाहेर जाण्याची वेळ आल्यास पांढरे कपडे घालून डोक्यावर टोपी, स्कार्फ, गॉगल यांचा उपयोग करावा. ज्यास्तीत जास्त पाणी प्यावे. कोल्ड्रिंक, चाहा, कॉपी, दारू, नॉनव्हेज मसाले भाज्या टाळाव्यात. प्रकृती अस्वस्थ वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जनावरांना थंड हवेच्या ठिकाणी ठेवावे. अशी विनंती हवामान खात्यामार्फत करण्यात आली आहे.यावर्षी उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.