मिशनरी रुग्णालयात मुन्नाभाई करत होता हृदय शस्त्रक्रिया, 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने भंडाफोड

एखाद्याचा जीव वाचवताना डॉक्टरच आपल्यासाठी देवासारखा धावून येतो. परंतु लंडन रिटर्न डॉक्टर असल्याचा दावा करत नरेंद्र विक्रमादित्य यादव नावाच्या मुन्नाभाई एमबीबीएसने हृदय शस्त्रक्रिया करत तब्बल सात रुग्णांचा एका महिन्यात जीव घेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील दामोह जिह्यात घडली. या बोगस डॉक्टरने आपली ओळख डॉ. एम. जॉन केम अशी करून दिली होती.

नरेंद्र यादव याने एखा खासगी ख्रिश्चन मिशनरीमध्ये नोकरी मिळवली होती. तिथे तो हृदयरोगतज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करत होता. नोकरी मिळाल्यानंतर त्याने ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया केली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत आणि अनुभवाबाबत चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याच्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली.