भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त विधानावरू सुप्रीम कोर्टात पुढच्या आठवड्यात सुनावणी

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात दुबे यांच्या अवमान याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. दुबे यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावर टीका केली होती.

सरन्यायाधीश हे यादवी युद्धासाठी जबाबदार आहेत असे विधान दुबे यांनी केले होते. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर या प्रकरणी तत्काळ सुनावणी झाली त्यावर कोर्टाने मंजूरी दिली.

काही दिवसांपूर्वीच दुबे यांच्या विरोधात अब्रुनूकसानीची याचिका दाखल करण्याची मागणी झाली होती. तेव्हा कोर्टाने वकिलांना सांगितले की यासाठी त्यांना कोर्टाची परवानगी घेण्याची गरज नाही. दुबे यांनी जे विधान केले त्यावर सरकार काहीच कारवाई करत नाही असा दावा याचिकाकर्ते वकिलांनी केला आहे. तसेच वकिलांनी अॅटर्नी जनरल आर वेंकटरमण यांना पत्र लिहून दुबे यांच्याविरोधात कारवाई करण्याबात मागणी केली होती, पण त्यावरही कारवाई न झाल्याचे वकिलांनी सांगितले.