
तूप म्हणजे पैष्टीक अन्न. म्हणूनच घरातील वडीलधारी माणसं तूप खाण्याचा सल्ला देतात. आपली आजी देखील वरण-भात, लाडू, खीर, पुरणपोळी अशा सगळ्या जेवणात तूपाचा वापर करते आणि आपल्याला खाऊ घातले. तुपामुळे तब्येत सुधारतेच आणि तब्येतीसोबतच रुपही खुलते. तूप खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहताच, शिवाय आजारांपासूनही दूर राहता. तूप खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुपाचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे देखील आहेत. सगळ्यांच्या शरिराला तूप फायदे देतं असं नाही तर, काहींच्या आरोग्याला तुपामुळे नुकसान पोहोचवू शकते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको म्हणून आज आपण कोणी तूप खाऊ नये, याबाबत माहिती घेऊया.

1.high cholesterol असलेल्या लोकांनी तूप खाणे टाळावे. कारण तुपामध्ये सैचुरेटेड फॅट असते त्यामुळे शरिरात खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढवू शकते. जर अशा लोकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय तूप सेवन केले तर हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
2.जास्त वजन किंवा लठ्ठपणा असलेल्या लोकांनी तुपाचे सेवन करू नये. कारण जास्त लठ्ठपणा असलेल्या लोकांनी तूप खाल्याने त्यांचे वजन आणखी वाढू शकते. ज्यामुळे अनेक प्रकारचे धोकादायक आजार होऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुपापासून दूर राहिले पाहिजे.
3.फॅटी लिव्हरने ग्रस्त रुग्णाने तूप खाल्ल्याने यकृतावर भार पडू शकतो, विशेषतः जर यकृत आधीच फॅटी असेल. अशा रुग्णांनी तुपापासून दूर राहावे. फॅटी लिव्हरने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी हे धोकादायक ठरू शकते.
4.पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी देखील तूप खाणे टाळावे. तूप तेलकट असते. त्यामुळे काही लोकांना ते पचवण्यास त्रास होऊ शकतो. अॅसिडिटी, अपचन, गॅस यासारख्या समस्या वाढू शकतात. यामुळे पोटाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
5.मधुमेहाच्या रुग्णांनी देखील तुपाचे अतिसेवन टाळावे. तूप थेट रक्तातील साखर वाढवत नाही, परंतु तुपाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा आणि इन्सुलिन प्रतिरोध यासारख्या समस्या वाढू शकतात.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आहारामध्ये तूप का असायला हवं! वाचा तूप खाण्याचे असंख्य फायदे