गृहकर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार!

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एचडीएफसी बँकेने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. बँकेने आपल्या कर्जदरात (एमसीएलआर) च्या दरात 0.05 टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा हप्ता वाढणार आहे. एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, वाहन कर्ज आणि पर्सनल लोन यांसारख्या बहुतांश ग्राहक कर्जांच्या दर निर्धारणासाठी मानदंड म्हणून वापरात येणारा एक वर्ष कालावधीचा ‘एमसीएलआर’ संलग्न व्याजाचा दर 9.45 टक्के राखून ठेवण्यात आला आहे. परंतु त्यापेक्षा कमी कालावधीच्या ‘एमसीएलआर’ संलग्न व्याजदर 9.10 टक्क्यांवरून  9.15 टक्क्यांपर्यंत ते 9.20 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. व्याजाचे नवीन दर गुरुवारपासून लागू झाले आहेत.