एचडीएफसीची क्रेडिट कार्ड आजपासून महाग

hdfc-bank

उद्या, 1 ऑगस्टपासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप व्रेड, चेक, मोबिक्विक आणि फ्रीचार्ज या अ‍ॅपचा वापर केल्यास ट्रान्झॅक्शन रकमेवर एक टक्का कर द्यावा लागणार आहे. याची मर्यादा 3 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. 15 हजारांहून अधिक फ्यूल
ट्रान्झॅक्शनवर एक टक्का सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे. म्हणजेच 1 ऑगस्टपासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून देवाणघेवाणीसाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.