एचडीएफसी बँकेचा वायू दलासोबत करार

एचडीएफसी बँकेने हिंदुस्थानी वायू दल आणि सीएससी अकादमीसोबत एक करार केला आहे. या प्रोजेक्टचे नाव ‘हवाई अनुभव कल्याण केंद्र’ असे आहे. हा प्रोजेक्ट संरक्षण खात्यांमधील पेन्शनधारक, त्यांच्या कुटुंबाची मदत आणि त्यांना सेवा देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. सुरुवातील वायू सेनेसाठी देशातील 25 केंद्रे देण्यात आली आहेत. यामध्ये नवी दिल्ली, पुणे, बंगळुरू, गुडगाव, सिकंदराबाद, गुवाहाटी, जोधपूर, चंदिगड यांसह 25 शहरांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला वायू सेनेच्या अधिकारी स्मिता भगत, एचडीएफसी बँकेचे संजय राकेश उपस्थित होते.