टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अल्पेश खारा (43) या हवाला ऑपरेटरला बेडय़ा ठोकल्या आहेत. गिरगावातून त्याला पोलिसांनी उचलले. त्याने कोटय़वधींची रोकड परदेशात पाठवली, असे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते.
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने आतापर्यंत तिघांना अटक केली होती. पोलिसांनी आता या गुह्यात हवाला ऑपरेटर अल्पेश खारा याला अटक केली आहे. खाराला न्यायालयात हजर केले असता त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
z पोलिसांनी टोरेसच्या कांदिवली येथील कार्यालयातील दोन तिजोऱ्या अखेर उघडल्या. या दोन्ही तिजोऱयांमध्ये 16 लाख 80 हजार रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागली. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 27 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
z आतापर्यंत पाच हजार 289 गुंतवणूकदार समोर आले आहेत. या गुंतवणूकदारांची 83 कोटी 63 लाख इतकी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सहा कोटी 74 लाखांची रोकड, चार कोटी 53 लाख किमतीचे सोने, चांदी व खडे, बँक खात्यात 15 कोटी 84 लाख रोकडचा समावेश आहे.