![fruits-new](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/10/Fruits-new-696x447.jpg)
बेढब शरीर असल्यामुळे अनेकांना न्यूनगंडाला सामोरं जावं लागतं. या बेढब शरीरामुळे आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच बेढब शरीराला उत्तम निरोगी बनविण्यासाठी वजन कमी करणं हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. वजन कमी करणं हा एक महत् प्रयास असतो. या प्रयासाला सामोरं जाताना, शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या थकायला होतं. तुम्हीही वजन कमी करण्याच्या मार्गावर असाल तर ही फळे तुमच्यासाठी आता वरदान ठरतील.
वजन कमी करण्यासाठी कोणती फळे लाभदायक आहेत हे आपण पाहुया.
सफरचंद
सफरचंद हे फळ वजन कमी करण्यासाठी पूरक मानले जाते. कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्याकारणाने सफरचंद हे वजन कमी करण्यासाठीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. सफरचंदामध्ये असणारे पोषक गुणधर्म हे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले जातात. आजारपण दूर करण्यासाठी सफरचंद हे फळ रामबाण असल्याचे म्हटले जाते.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/03/APPLE-3.jpg)
किवी
किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. फायबरचे प्रमाण भरपूर मात्रेमध्ये असल्यामुळे किवी वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2019/03/KIWI-1.jpg)
टरबूज
टरबूज हे फळ अधिक पाण्याची मात्रा असल्यामुळे, कॅलरी कमी करण्यासाठी उत्तम मानले जाते. शिवाय टरबूजामध्ये असलेले पोटॅशियम हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे.
(वरील कोणतेही उपाय करताना आपण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)