
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. अटक केलेले सर्व लोकं आयोजन समितीचे सदस्य आणि सेवक आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयजी अलीगढ रेंजचे शलभ माथुj यांनी ही माहिती दिली.
शलभ माथुर पत्रकार परिषदेत म्हणाले की, 121 मृतांची ओळख पटली आहे. सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नेमणूक केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 12 लोकं पोलिसांच्या ताब्यात आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली आहे. चेंगराचेंगरीत 112 महिलांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, याप्रकरणी भोले बाबा चा रोल समोर आल्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणातील मुख्य आरोपी सेवक प्रकाश मधुकर याच्यावर 1 लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात एनबीडब्ल्यूचीही कालवाई होईल. आग्रा पोलीस ठाण्यात 2000 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यासाठी आमची टीम जून स्तरावर कार्यरत आहे. बाबांच्या नावाने कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा शलभने केला.
अटक केलेल्या लोकांमध्ये राम लदाईते मुलगा राहबरी सिंग यादव ( मैनपुरी), उपेंद्रसिंग यादव मुलगा रामेश्वर सिंग ( फिरोजाबाद), मेघसिंग मुलगा हुकुम सिंग (हाथरस), मुकेश कुमार मुलगा मोहर सिंग (हाथरस), मंजू यादव पत्नी सुशील कुमार (हाथरस), – मंजू देवी पत्नी किशनकुमार यादव (हाथरस) अशी नावे आहेत. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 105, 110, 126(2), 223 आणि 238 अंतर्गत आरोपींना अटक केली आहे.