हरयाणाच्या सीरियल किलरला गुजरातमध्ये अटक, 25 दिवसांत चार हत्या, मृतदेहावरही बलात्कार

गुजरातमधील वलसाड येथे 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱया हरयाणातील सीरियल किलरला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. 25 दिवसांत त्याने आणखी चार हत्या केल्याची कबुली दिली असून एका मृतदेहावरही त्याने बलात्कार केल्याचे म्हटले आहे. गुजरात पोलिसांनी त्याला न्यायालयात दाखल केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. चोरीच्या घटनांमुळे आरोपीला त्याच्या कुटुंबीयांनी घरातून हाकलून दिले होते. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.

वलसाडच्या पारडी तालुक्यातील मोतीवाला परिसरात राहणारी बी.कॉमच्या दुसऱया वर्षाची विद्यार्थिनी टय़ुशनवरून घरी परतत असताना आरोपीने निर्जन रस्त्यावर तिला झुडपात ओढले आणि बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला होता. दोन तासांनंतर तो पुन्हा घटनास्थळी परतला आणि दोन वेळा विद्यार्थिनीच्या मृतदेहावरही दोन वेळा बलात्कार केला. याचदरम्यान काही लोक येण्याचा आवाज ऐकून तो घाईघाईने टी शर्ट आणि बॅग मागे टाकून पळून गेला होता. विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी वलसाड जिह्यातील तीन पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 10 पोलीस पथके तैनात करण्यात आली. तब्बल 100 सीसीटीव्ही पॅमेऱयांच्या आणि 2 हजार फुटेज तपासण्यात आले. आरोपी चोरीच्या गुह्यात सुरतच्या तुरुंगात असल्याची माहिती मिळाली. याच प्रकरणात त्याला जामीनही मिळाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची शोधमोहीम राबवली. पोलिसांनी त्याला उडवाला रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.

  • विद्यार्थिनीच्या हत्येच्या एक दिवस आधी तेलंगणातील सिकंदराबाद येथे दरोडय़ाच्या वेळी एका महिलेची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. याआधी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेत त्याने एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. याच महिन्यात त्याने पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनजवळ एका वृद्धाची चाकूने वार करून हत्या केली. तसेच कर्नाटकातील मुल्की स्टेशनवर एका प्रवाशाला विंडो सीट न देण्याच्या क्षुल्लक कारणावरून भोसकून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.
  • या कारवाईत गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यांतील पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. एक व्हॉट्सअॅप ग्रूप तयार करण्यात आला आणि सोशल मीडिया ग्रूपमध्ये माहितीही शेअर करण्यात आली. विद्यार्थिनीच्या हत्येच्या 11व्या दिवशी आरोपी वापी रेल्वे स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी त्याला पकडले.