चार कोटी, भूखंड की नोकरी; विनेश फोगाटला हरियाणा सरकारची ऑफर

ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू विनेश फोगाटने गतवर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठून इतिहास घडविला होता. मात्र फायनलच्या कुस्तीपूर्वी 100 ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले होते. आता हरियाणा राज्य सरकारने तिला ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या खेळाडूप्रमाणे सन्मानित करण्यासाठी चार कोटी रुपयांचे रोख बक्षीस, हरियाणा शहरी विकास प्राधिकरण अंतर्गत भूखंड किंवा क्लास वनची नोकरी यापैकी काहीही एक स्वीकारण्याची ऑफर दिली आहे.

हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच विनेशच्या पुरस्काराबाबत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदार विनेश फोगाटला हरियाणा सरकारने त्यांच्या क्रीडा धोरणांतर्गत राज्य लाभांबाबत तीन पर्याय दिले आहेत, मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट काँग्रेसकडून आमदार झाली. त्यामुळे तिला सरकारी नोकरी सोडून इतर दोन्हींपैकी एक पर्याय स्वीकारावा लागणार आहे. दरम्यान, सरकारच्या या प्रस्तावाला विनेश फोगाटने अद्यापि कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

काही दिवसांपूर्वी विनेश फोगाटने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. पॅरिस ऑलिम्पिकला आठ महिने उलटूनही मला बक्षीस रक्कम मिळालेली नाही. नायब सैनी यांनीच तेव्हा घोषणा केली होती की, ते विनेशला देशाच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला मिळणारे सर्व लाभ आणि सन्मान देतील. हा पैशांचा विषय नाही, तर सन्मानाचा विषय आहे,