वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवारांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगण घातले – हर्षवर्धन सपकाळ

वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवारांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगण घातले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवारांनी सत्तेसाठी भाजपापुढे फक्त लोटांगणच घातले नाही तर अल्पसंख्यांक समाजाचा विश्वासघात केला आहे.”

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लीम समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या दादांनी कोलांटीऊडी मारत भाजपाची लाचारी पत्करली. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घेऊन जनतेने यांच्यापासून सावध रहावे.”