हरिद्वारमध्ये राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे चमकदार कामगिरी करण्यासाठी खेळाडू प्रचंड मेहनत घेत आहेत. याच दरम्यान राष्ट्रीय हॉकी खेळाडूवर प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना क्रीडा शिबीरादरम्यान घडली आहे. रविवारी अल्पवयीन मुलीने प्रशिक्षकाविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ मुलीची वैद्यकीच तपासणी केली आणि पॉक्सो व BNS 64 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रशिक्षकाची नियुक्तीही रद्द करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रशिक्षक भानु अग्रवालला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु या घटनेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हरिद्वारमध्ये 38 व्या राष्ट्रीय खेळांचे 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू कसून सराव करत आहे. मात्र हॉकी खेळाडूवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.